रमजान ईद साधेपणे साजरी करुन गरिबांना मदत करा-जे. डी शाह
----------------------------
बीड - प्रतिनिधी
देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे आलेले संकट पाहता यंदा संपूर्ण महाराष्ट्रात सर्व मुस्लीम बांधवांनी साध्या पद्धतीने रमजान ईद साजरी करण्याचा सामुदायिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे रमजान ईद निमित्त नेहमी मोठ्या प्रमाणात केली जाणारी खरेदी न करता सर्व जाती धर्मातील गोरगरीब, गरजू यांना मदत करावी, असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते जे.डी शाह यांनी एका प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिद्ध केलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की महाराष्ट्रात रमजान ईल साजरी करताना शासनाने लागु केलेल्या लॉकडाऊनचे उल्लंघन न करता सर्व नियमाचे तंतोतंत पाळावे असे ही आवाहन अनेक धर्म गुरुसह मान्यवरांनी केलेल्या आवाहनाला राज्यातील सर्व मुस्लीम बांधवांनी उस्फूर्त प्रतिसाद देत यंदा ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात अनेक शहरातील मशिदीच्या गेटसमोर ईद साध्या पद्धतीने साजरी करावी असे बोर्ड देखील लावण्यात आलेले आहेत.अशी माहिती पत्रकात जे डी शाह यांनी दिली आहे.
पत्रात पुढे म्हटले आहे की इस्लाम धर्मात पवित्र रमजान महिन्याला एक आगळेवेगळे महत्व आणि स्थान आहे. त्यामुळे जगभरातील मुस्लीम बांधव या महिन्याची आतुरतेने वाट पाहतात. या महिन्यात रोज 5 वेळा नियमितपणे अदा केली जाणाऱ्या नमाज व्यतिरिक्त तरावीहची विशेष नमाज देखील अदा केली जाते. शिवाय संपूर्ण महिना रोजे धरले जातात त्यासाठी पहाटे सहेरी केली जाते. तर सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर रोजा इफ्तार केला जातो.
रमजान महिना सुरु होताच गावखेडा असो अथवा मोठे शहर सर्व ठिकाणी मशिदीमध्ये मुस्लीम बांधवांची मोठी गर्दी असते. शिवाय या महिन्यात जकात आणि फित्रा देखील मोठ्या प्रमाणात दिला जातो. मात्र यंदा देश आणि जगावर कोरोनाचे संकट आल्यामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्याचे तंतोतंत पालन केले जात असल्याने राज्यातील सर्व शहरातील सर्व मशिदीत फक्त मौलाना आणि ४ते५ जण नमाज अदा करत आहेत. तर इतर सर्व मुस्लीम बांधव हे आपापल्या घरात नमाज, रोजा इफ्तार करून नमाज अदा करत आहेत.
रमजान महिना शेवटच्या टप्प्यात आला असून अवघ्या काही दिवसावर ईद येवून ठेपली आहे. मात्र कोरोनाचे संकट अजून ही देशावर कायम आहे. त्यामुळे यंदा रमजान ईद साध्या पद्धतीने साजरी करणे अत्यंत गरजेचे झाले आहे .कारण या कोरोनामुळे दिड महिन्यापासून लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर असलेल्या सर्व जातीधर्मांच्या लोकावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सर्वांनी ईद निमित्त कोणतीही नवीन वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी न करता या गोरगरिबांची मदत करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते जे. डी. शाह यांनी करून पुढे म्हटले आहे की
आम्ही भारतीय मुस्लिम असल्याचा आम्हाला अभिमान आहे. देशावर आलेले संकट हे दुर्दैवी आहे. आम्ही देखील सरकारसोबत आहोत. कोरोनामुळे आमच्या देश बांधवांनी बांधवांनी रामनवमी, हनुमान जयंती, गुढीपाडवा, जैन बांधवांनी महावीर जयंती, भीम सैनिकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साध्या पद्धतीने साजरी केली. मग आम्ही ईद धुमधडाक्यात कशी साजरी करू शकतो. आम्ही देखील या देशाचे जबाबदार नागरिक नव्हे तर देशभक्त नागरिक आहोत. महाराष्ट्रातील कोणताही मुस्लिम शासनाच्या निर्णयाविरोधात जाणार नाही. यावर्षी आम्ही मुस्लिम ईद अगदी साधेपणाने साजरी करणार आहोत”, असे सर्व सामान्य मुस्लिम बांधवांच्या तोंडी ऐकायला मिळत आहे.
करोनामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन आहे. सर्व व्यवहार ठप्प आहेत. अनेकांचे रोजगार बंद आहेत. हे पाहता यंदा रमजान ईदसाठी जास्त खर्च न करता ती साधेपणाने साजरी करावी. ईदसाठी फित्रा आणि जकात (दान) आपल्या जवळच्या किंवा आपल्या भागातील गरिबांना द्यावे, असे आवाहन मुस्लिम धर्म गुरू सह समाजातील मान्यवरांनी केले आहे.
मुस्लिम बांधवांसाठी रमजान महिना ईद आणि रमजानचा सण अत्यंत महत्त्वाचा आहे. या संकटाच्या काळात सणाच्या वेळी प्रत्येकांनी आपल्या जवळचे गरीब, गरजू आणि रुग्णांची काळजी घेण्यासाठी काम करण्याची गरज आहे. सध्या लॉकडाऊन किती दिवस चालेल, आगामी परिस्थिती कशी असेल, हे आत्ता सांगता येत नाही. ते पाहता यंदाची ईद साध्या पद्धतीने साजरी करावी, असे आवाहन व्हॉट्सअॅप, सोशल मीडियातून समाजातील मान्यवरांनी केले आहे.असे पत्रकात म्हटले आहे
याबाबत प्रसिध्द केलेल्या पत्रात जे .डी यांनी म्हटले आहे की रमजान महिना इबादतीचा आहे. या काळात मुस्लिम बांधवांनी ईदवर खर्च न करता, तो पैसा गरिबांच्या दोन वेळच्या अन्नासाठी व औषधांसाठी वापर करावा, असे नियोजन केले आहे.सध्या असलेल्या लॉकडाऊनमुळे गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. या काळात गरिबांची काळजी घेणे आवश्यक आहे. ईदसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. यंदा खरेदीसाठी
होणारा खर्च टाळून त्या पैशातून गरिबांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा,' असे भावनात्मक आवाहन करतांना विनंती केली आहे .
जे. डी शाह म्हणतात की यंदा मुस्लिम बांधवांनी ईदची जास्ती ची खरेदी करू नये. हा पैसा गरिबांच्या मदतीसाठी वापरावा. काही पैसा आपल्या गरजांसाठी संभाळून ठेवावा,' 'रमजान ईद हा त्याग आणि बलिदानाचा सण आहे. या काळात प्रत्येक जण गरिबांसाठी जकात काढतात. सध्याचा काळ बघता, ईद साध्या पद्धतीने साजरी करून गरिबांपर्यंत जास्तीत जास्त मदत देण्याच्या कार्यात सहभागी व्हा,
करोनाच्या संकटामुळे सध्या बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्य शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या काळात आपण ईद साध्या पद्धतीने साजरी करून आपल्या भागातील गोर गरिबांची काळजी घ्यावी. खरेदीसाठीचा खर्च कमी करून दान करावे. रमजान महिना प्रत्येकांसाठी महत्वाचा आहे. या काळात परिसरातील गरीब उपाशी राहू नये याची काळजी घ्या. ईद साध्या पद्धतीने साजरी करा. बाजारपेठेत गर्दी करू नये. ईदवर होणाऱ्या खर्चातून आपल्या जवळच्या गरीब नातेवाईकांपासून ते शेजाऱ्यापर्यंत साऱ्यांना मदत करावी असे विनंती वजा आव्हान सामाजिक कार्यकर्ते जे. डी शाह यांनी पत्रकात शेवटी केले आहे.
