कोवीड RT - PCR चाचणीचा रिपोर्ट येईपर्यंत रुग्णांना प्राथमिक औषधी देण्यात यावीत.
कडुदास कांबळे
---------------------------------------------------------
गेवराई ( प्रतिनिधी ) दि. १ मे :- कोवीड RT - PCR चाचणीचा रिपोर्ट येण्यासाठी किमान तीन ते चार दिवसाचा कालावधी लागतो म्हणून लक्षणे असणाऱ्या रूग्णांनावर तात्काळ उपचार सुरू करावेत असे मत महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा समितीचे अध्यक्ष कडुदास कांबळे यांनी व्यक्त केले आहे.
कोवीड RT - PCR ही टेस्ट करण्यासाठी दवाखान्यात येणाऱ्या लोकांमध्ये दोन प्रकार आहेत. एक ज्यांना आजाराच्या संदर्भाने काही लक्षण आहेत, जसे ताप, सर्दी, खोकला, तोंडाला चव नसणे आणि दुसरे जे की कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले असतात आणि त्यांना खात्री करायची असते की आपल्याला कोरोना झाला आहे किंवा नाही.
यामध्ये पहिल्या प्रकारांमधील जे लोक आहेत की ज्यांना कोरोना आजाराची काही लक्षणे वाटतात त्यांच्यावर प्रशासनाने ताबडतोबीने प्राथमिक उपचार करणे आवश्यक आहे. तसेच त्यांना व होमक्वारंटाईनची सक्ती करून त्यांना तसे शिक्के मारण्यात यावेत. आणि होमक्वारंटाईन केलेला व्यक्ती जो बाहेर सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसेल त्याच्याकडून दंड वसूल करण्यात यावा.
कोरोना आजाराची काही लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना कोवीड RT - PCR चाचणीचा रिपोर्ट येईपर्यंत संबंधित रुग्णाचा आजार वाढत जातो. पर्यायाने बऱ्याच लोकांची ऑक्सीजन लेव्हल कमी होते आणि धावपळ सुरू होते, आणि प्रशासन हतबल होते आहे. आणि म्हणूनच कोरोनाची जी लक्षणे जसे ताप, सर्दी, खोकला, तोंडाला चव नसणे दिसताक्षणीच त्या रुग्णावर उपचार सुरू करावेत.
