चकलांबा येथे २०० बेडचे कोवीड केअर सेंटर तात्काळ चालू करा
-----------------
राष्ट्रीय काँँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड गणेश कोल्हेंची मुख्यमंत्री,आरोग्य मंत्री ,महसुल मंत्री तसेच पालकमंत्र्याकडे निवेदनाद्वारे मागणी
-----------------
गेवराई :
तालुक्यातील मौजे चकलांबा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्या अंतर्गत सहा उपकेंद्र आहेत. परंतु , त्या ठिकाणी कोवीडच्या पेशंटवर विलाज करण्यासाठी कुठलीही योग्य ती सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे चकलांबा येथे अति - तात्काळ २०० बेडचे व्हॅन्टेलेटर सह कोवीड केअर सेंटर चालु करावे अशी मागणी राष्ट्रीय काँँग्रेसचे बीड जिल्हा उपाध्यक्ष अॅड गणेश कोल्हे यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे,आरोग्य मंत्री राजेशजी टोपे, महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात, पालकमंत्री धनंजयजी मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बीड जिल्ह्यासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोवीड रुग्णांची दिवसेंदिवस वाढणारी रुग्ण संख्या चिंताजनक असून कोरोना पेशंटला ऑक्सीजन व व्हेन्टेलेटरची आवश्यकता भासल्यास प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या चकलांबा या ठिकाणी ती व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे कोरोना पेशंटला गेवराई व बीड सह अन्य ठिकाणी जावे लागत आहे.पेशंट सिरीयस असल्यास त्यास ऑक्सीजन ,व्हेन्टेलेटर व आदि सुविधे अभावी कित्येक पेशंटचे मृत्यू देखील होत आहेत.तसेच चकलांबा येथून गेवराई व बीडचे भरपूर अंतर असून कोरोना पेशंटला हॉस्पीटल पर्यंत घेवुन जातांना खुप विलंब होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे ,आरोग्य मंत्री राजेशजी टोपे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री धनंजय मुंडे तसेच जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते की मौजे चकलांबा, ता गेवराई जि. बीड येथे शासकीय शाळा , महाविद्यालय तसेच योग्य त्या ठिकाणी जागा उपलब्ध करुन त्या ठिकाणी अति - तात्काळ २०० बेडचे व्हॅन्टेलेटरचे कोवीड केअर सेंटर सुरु करावे अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे बीड जिल्हा उपाध्यक्ष अॅड.गणेश मारोती कोल्हे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
