तृतीयपंथीयांना ओबीसी फौंडेशन इंडिया तर्फे किराणा वाटप
पुणे प्रतिनिधी
तृतीयपंथीयांना ओबीसी फौंडेशन इंडिया तर्फे किराणा वाटप.कोरोनामुळे ज्यांचे हातावर पोटे आहेत त्यांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातीलच एक भाग तृतीयपंथी. या लोकांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कृष्णमीरा या तृतीय पंथी यांनी आपली ही व्यथा ओबीसी फौंडेशन इंडिया च्या राष्ट्रीय अध्यक्ष स्वातीताई मोराळे यांना फोन वरून सांगितले. याची दखल घेत स्वातीताई मोराळे यांनी अन्नदान करणाऱ्या ब्यक्तींशी संपर्क साधला. कोंढव्याचे उद्योगपती प्रविण भन्साळी यांनी लगेच किराणा उपलब्ध करुन दिला. प्रिया सोनार यांच्या मदतीने स्वातीताई मोराळे यांनी कात्रज,कोंढवा,स्वारगेट व सिंहगड रोड येथील तृतीय पंथी लोकांना किराणा वाटप केला.
यावेळी कृष्णमीरा यांनी त्यांचे प्रश्न स्वातीताई मोराळे यांच्या समोर मांडल्या. या लोकांना आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, मतदान कार्ड यापैकी कोणतीही कागदपत्रे त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत. यामुळे त्यांना कोणत्याही शासकीय योजनाचा लाभ घेता येत नाही. यापैकी अनेकांची बँकेत खातेही नाहीत. या लोकांना समाज व घरचेही स्वीकारत नाहीत. यामुळे यांच्याकडे राहण्याचा कोणताही पुरावा नाही. यांच्याकडे भाडे करार नाहीत.त्यामुळे या लोकांच्याकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे उपलब्ध नाहीत. यावेळी ही कागदपत्रे मिळवून द्या अशी त्यांनी विनंती केली. लॉक डाऊन संपल्यानंतर या लोकांना सर्वांतोपरी आपण मदत करू असे स्वातीताई मोराळे यांनी सांगितले.पुणे येथील कोणत्याही तृतीय पंथी लोकांना किराणा कमी पडला तर त्यांना ओबीसी फौंडेशन इंडिया तर्फे आम्ही पुरवू असे स्वातीताई यांनी सांगितले.
