सय्यद गुरुजी साहित्य अकादमी तर्फे शिक्षक दिनी भेट पुस्तकांचे दुसर वर्ष
आष्टी प्रतिनिधी
सय्यद अमीनोद्दीन मास्टर उर्फ सय्यद गुरुजी यांच्या नावे सय्यद गुरुजी साहित्य अकादमीच्या वतीने दरवर्षी शिक्षक दिनी एका शाळेला,लहान मुलांना आवडतील अशा 51 पुस्तकांची भेट देण्याचा संकल्प सन 2024 पासून सुरू करण्यात आला आहे.सय्यद गुरुजी यांचे मूळ गाव,मौजे चिंचाळा.या गावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून याची सुरुवात झाली.आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा,धामणगाव,हिवरा,मांडवा,बेलगाव,आष्टी या गावी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून सय्यद गुरुजी यांनी सेवा केली.यावर्षी आष्टीच्या जिल्हा परिषद मुलांच्या माध्यमिक शाळेला शिक्षक दिनाच्या निमित्ताने पुस्तकांची भेट देण्यात येणार आहे.दिनांक पाच सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद असल्याने हा कार्यक्रम 4 सप्टेंबर रोजी होणार आहे.असे सय्यद गुरुजी यांचे चिरंजीव कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांनी सांगितले.त्यांचे इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षणही या शाळेतच झाले आहे.
