महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

!! गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वराय!!!! गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः!! कैवल्याचा पुतळा गुरुदेव माझा !!

!! गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वराय!!
!! गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः!!

कैवल्याचा पुतळा गुरुदेव माझा !!

असे आमचे गुरुवर्य नीळकंठ मोरे सर
पृथ्वी तलावर जन्माला आलेली "महान् आत्मा" म्हणजे मोरे सर संपूर्ण विश्वात पसरलेली महामारी म्हणजे कोरोना काळ.....हा भूतलावर आलेला कहरच खूप ठिकाणी पुर्ण परीवार उध्वस्त झाले. जगाच्या पाठीवर कुठलाही देश, राज्य,शहर,जिल्हा, तालुका,असो किंवा ग्रामीण भागात या महामारीचा कहरच चालू होता. अशा परिस्थितीत कंधार तालुक्यातील पानशेवडी या छोट्याशा गावातील रहिवासी असलेले श्री.नीळकंठ मोरे सर यांनी गुगल मीटच्या माध्यमातून योगसाधनेचा वसा हाती घेतला. तसे हे कार्य जवळजवळ वीस वर्षापासून आजपर्यंत निःशुल्क अविरत चालू आहे.  पण कोरोना काळात सगळीकडे जिवघेणा कहरच चालू असताना,जातीने पुढे येऊन योगसाधनेच्या स्वरूपात समाज रक्षण कार्य हाती घेतले. ही एक खूप मोठी समाज सेवाचं आहे.
योग रुपी सेवा करत असताना त्यांच्यावर बर्याच वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आल्या. मानसिक  आघात तसेच शारीरिक आघातामुळे मुळे त्यांना असहनीय गोष्टींना तोंड द्यावे लागले. तरीही कुठेही न डगमगता स्वतः हाती घेतलेले योगरुपी समाज कार्य सहज पणे पार पाडतात. दररोज सकाळी पहाटे पाच पासून ते सकाळी सात वाजेपर्यंत सलग दोन तास आरोग्य विषयावर मार्गदर्शन करत  उपस्थित योगसाधकांडून विविध योगासने,प्राणायाम,सुक्ष्म व्यायाम ,सुर्यनमस्कार,योगा जाॕगिंग,ध्यानधारणा इत्यादी संगीतमय वातावरणात प्रत्यक्ष करून घेतात.
 हा योगवर्ग म्हणजे महिलांसाठी वरदानच ठरला आहे.
   कोरोना संपला तरीही पण जवळजवळ दोन वर्षापासून हा योगवर्ग सातत्याने चालू आहे.
 आता तर मोरे सरांच्या मदतीला विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील  मलकापूरची सौ.मंजूताई संचेती नांवाची योगसखी लाभलेली आहे.
 ही भगिनी म्हणजे ग्रुप मधील सर्वांना आपलं करुन टाकणारी एक अबोध बालीका वयाने जरी मोठीं असली तरी पण सर्वांचीच छोटीशी मंजुताई.... लहान असोत किंवा वयोवृद्ध सर्वांचे मन जिंकून घेणारी योगाच्या माध्यमातून सर्वांना लाभलेली अनमोल सखी.हसत खेळत संगीतमय वातावरणात योगाभ्यास करून घेणारी.मलकापूर मध्ये राहून मराठवाडा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून सर्व योग साधकांच्या मनात एक भगिनीचं स्थान प्राप्त करून एक योग परीवार बनवून आजन्म नातं तयार केले. असे योगशिक्षण फक्त कंधार तालुक्यालाच नाही तर गुगल मीटच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला लाभले. तसेच योगशिक्षक श्री.विलास बिरादार सर ह्यांनी पण योगवर्गाला आपला शिक्षकी पेशा सांभाळून वेळातला वेळ काढून स्वतः चा अमुल्य वेळ या योगवर्गाला देतात तसेच ज्या शाळेतते शिक्षक आहेत त्या शाळेतील विद्यार्थ्यांना   योगसाधना पण शिकवतात.
मोरे सरच्या योगवर्गाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कुठलीही कसर बाकी ठेवत नाही म्हणून श्री.विलास बिरादार सर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक योगवर्ग सुरू होणार........
!! जय हो गुरु देव जय हो!!

योगाभगिनी ;*सौ.उज्ज्वला बालाजीराव गुरसुडकर*
🙏🌹🧎‍♂️🧎‍♂️🧘‍♂️🧘‍♀️😷🦚🦚🌹🙏