महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

वार्षिक स्नेह संमेलनातून चिमुकल्यांच्या कला गुणांना वाव मिळतो - रणवीर पंडित तुळजा भवानी इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेसंमेलन उत्साहात संपन्न

वार्षिक स्नेह संमेलनातून चिमुकल्यांच्या कला गुणांना वाव मिळतो - रणवीर पंडित
-----------------
तुळजा भवानी इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेसंमेलन उत्साहात संपन्न
----------------
गेवराई (प्रतिनिधी) बाल वयातच विद्यार्थ्यांच्या मनाची जडणघडण होते, त्यामुळे शाळेत होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात आपल्या बालकांनी सहभाग घेतला पाहिजे यासाठी पालकांनी नेहमी आग्रही असले पाहिजे, कारण बालवयातच त्याच्यावर योग्य संस्कार होत असतात, तर शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या माध्यमातून या चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव मिळत असल्याचे प्रतिपादन युवा नेते रणवीर अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केले.

गेवराई येथील तुळजा भवानी इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेसंमेलन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दिपक अतकरे, तर, सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष जंजाळ, पत्रकार भागवत जाधव, बाळासाहेब दाभाडे, गणेश तांबे सर, विनोद खराद सर, भागवत गळगुंडे,  रमेश रोडगे, गणेश लहाने, यांची प्रमुख उपसथिती होती.
 सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दिप 
प्रज्वलन करुन महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलंम्पीयाड  परीक्षेमध्ये सिया कोरडे, संग्राम काकडे, रुद्राक्ष गायकवाड, हर्षवर्धनसिंग चौंडीया, शिंगने वेदांत या विद्यार्थ्यांना मान्यवरांचा हस्ते गोल्ड मेडल देण्यात आले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, आजकाल पालकांना आपल्या मुलांवर संस्कार करायला वेळ नाही मिळत नाही. मात्र तुळजा भवाणी इंग्लिश स्कूल सारख्या या शाळेत दर वर्षी वार्षिक स्नेह संमेलन घेऊन या चिमुकल्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळत असून ही कौतुकाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले तर या उत्कृष्ट नियोजनाबद्दल त्यांनी शाळेचे मुख्य संचालक तथा मुख्याध्यापक विकास कोकाटे सर यांचे कौतुक केले. यावेळी सपोनि संतोष जंजाळ यांनी पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल पासून दूर ठेवले पाहिजेत असे सांगत मोबाईल पासून लहान मुलांवर होणारे परिणाम सांगत त्यांना अभ्यासाची गोडी निर्माण होईल अशा उपाययोजना कराव्यात असे सांगितले. 
दरम्यान यानंतर मुख्य संस्कृतीक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सर्व प्रथम मी मराठी या गीताने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली, आई जगदंबे, लिंबूनीच लिंबू, आज है संडे, दमलेल्या बाबाची कहाणी, दैवत छत्रपती, इथ पाय ठेवण्या अगोदर, क्लॅप युवर हेन्डस, चंद्रा, मेरा जुता है जपानी, कोळीगीत, तुझ्या रूपाचं चांदणं, पांडुरंग दंग झाला, भुरुम भूरुम,  केळेवाली, वेड, ये तो सच है की भगवान है, बडे मियां छोटे मिया, फ्रेंड्स, किसी डिस्को मे जाये, लेजा लेज, ओ ओ जाणे जाना, योध्दा बन गई मै, झुमकेवली पोरं, आपली यारी, रखुमाई, इंदुरीकर महाराज,  बंधन चली, रट्टा मार, अशा विविध गीतावर विद्यार्थ्यानी नृत्य सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक विकास कोकाटे सर यानी केले तर सूत्रसंचालन गीता मोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी  छाया विटेकर, अर्चना काळे, आरती कोकाटे, शिंदे शालुबई, श्रद्धा नळदुर्गकर, जयमाला खंडागळे, सीमा घुंबार्डे, दत्ता गवळी सर, विष्णू कदम सर, भागवत परळकर, विनोद सूर्यवंशी, रवी घाडगे, धीरज गळगुंडे, यश अतकरे यां विशेष परिश्रम घेतले.