गेवराई : प्रतिनिधी
महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून समोर आली आहे. येथे एकाच कुटुंबातील सात जणांनी नदीमध्ये उडी घेऊन सामूहिक आत्महत्या केली. ही घटना 17 जानेवारी रोजी घडली असून याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलाने मुलगी पळवून नेल्याच्या रागातून बदनामीच्या भीतीने कुटुंबाने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदी पात्रात सोमवारी एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह सापडले होते. आज मंगळवारी, 24 जानेवारी रोजी दुपारी 1 नंतर या नदीपात्रात पुन्हा तीन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले आहेत. या सर्व मृतदेहांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे.दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदी पात्रात सोमवारी एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह सापडले होते. आज मंगळवारी, 24 जानेवारी रोजी दुपारी 1 नंतर या नदीपात्रात पुन्हा तीन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले आहेत. या सर्व मृतदेहांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे.
मोहन उत्तम पवार (वय 50), संगीता मोहन पवार (वय 45, दोघे रा. खामगाव, ता. गेवराई), त्यांचे जावई श्यामराव पंडित फुलवरे (वय 32), त्यांची पत्नी राणी श्यामराव फुलवरे (वय 27), श्यामराव फुलवरे यांचा मुलगा रितेश – श्यामराव फुलवरे (वय 7), छोटू श्यामराव फुलवरे (वय 5) आणि कृष्णा (वय-3) अशी मृतांची नावे आहेत.मौजे खामगाव, ता.गेवराई येथील मोहन पवार व कुटूंबिय शेतमजुरीसह इतर व्यवसायासाठी निघोच, ता.दौंड येथे सुमारे वर्षभरापासून वास्तव्यास होते. पवार कुटूंबातील सात जणांचे मृतदेह भिमा नदीच्या पात्रात सापडल्याची घटना आज घडली. या घटनेमुळे खामगाव व परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.शेतमजुरी करणाऱ्या मोहन पवार व त्यांच्या कुटूंबियांच्या मृत्युची घटना अत्यंत वेदनादायी आहे.