जगदंबा ग्राम विकास पॅनलच्या सर्व उमेदवाराला बहुमताने विजयी करा:-किशोर ठोसर
गेवराई (प्रतिनिधी) सिंदखेड तालुका गेवराई जिल्हा बीड येथील गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जगदंबा ग्रामविकास पॅनलच्या सर्वच उमेदवाराला विजयी करा असे आवाहन किशोर ठोसर यांनी केले आहे.गेवराई तालुक्यातील जवळच असलेल्या सिंदखेड सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक 2022राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत मा. श्री विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली जगदंबा ग्राम विकास पॅनल सिंदखेड येथील सरपंच पदाचे उमेदवार महादेव बापूराव ठोसर, तसेच वार्ड क्रमांक एक चे उमेदवार दत्ता सर्जेराव ठोसर ,मंदा किसन ठोसर व वार्ड क्रमांक दोन चे उमेदवार आशाबाई संपत ठोसर, सुमित्रा संभाजी ठोसर, सरस्वती रामेश्वर क्षिरसागर, वार्ड क्रमांक तीन चे उमेदवार दिगांबर बाबासाहेब वाळेकर, नंदा गुलाब मस्के यांना मायबाप मतदार बंधू-भगिनींनी प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन किशोर ठोसर यांनी केले आहे.