वेळेवर आला पाऊस..!
गेवराई प्रतिनिधी
: ऑगस्ट चा महिन्यात जवळपास वीस दिवस पाऊस गायब झाला होता. त्यामुळे,
वेळेवर पाऊस पडला तर ठिक नसता कोरडवाहू भागातील पिके पूर्णत: धोक्यात आली होती. मात्र, सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावून तालुक्यातील पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकरी सुखावल्याचे चित्र आहे.
दरम्यान, पाऊस रूसल्याने पावसाच्या थेंबा ऐवजी शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रुंचा "थेंब" पडेल की काय ? अशी भयावह स्थिती निर्माण झाली होती. पावसाचे आगमन झाले असले तरी काही भागातील सोयाबीन, मुगाच्या पिकाला फटका बसला आहे.
पावसाने अचानक पाठ फिरवल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहीले होते. मराठवाडा विभागातल्या बहुतांश भागात पावसाने ओढ दिल्याचे चित्र होते. कापसासारखे नगदी पीक धोक्यात आले होते. कोरडवाहू जमिनीतील, काही ठिकाणची पिके खुंटली आहेत. त्यांची वाढ थांबल्याने फटका बसला आहे. उशिरा पेरा झालेल्या मुगावर ही कीड पडली. त्यामुळे, उत्पादनात घट झाली आहे. यंदाच्या हंगामात
गेवराई परीसरात कपाशी , तूर , बाजरी , सोयाबीन, मटकी, मूग, आदी पिकांचा पेरा झाला आहे. यावर्षी सुरुवातीलाच पावसाने आशा पल्लवित करून, शेतकऱ्यांना पेरते व्हा, म्हणून संदेश दिला होता. जून मध्ये दोन दिवस जोरदार पाऊस पडला. शेतकऱ्यांनी उत्साहात पिकांची पेरणी केली आहे. या वर्षी ही ऊस आणि कापुस लागवडीवर भर दिलेला आहे. अचानक, पाऊस थांबल्याने, शेतकरी हतबल झाला होता. नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. गेल्या वर्षी, 8 सप्टेंबर 2021 रोजी गेवराई तालुक्यातील विविध भागात असलेले तलाव ओव्हरफ्लो होते आणि काही ठिकाणच्या बोअरवेल मधून पाणी वाहत होते. त्या मानाने , या हंगामात मुबलक पाऊस झालेला नाही. अजून ही पाण्याची गरज आहे. विहिरीत पाणी आले आहे पण ते वाढण्याची आवश्यकता आहे. पुढच्या दोन - चार दिवसांत चांगला पाऊस पडला पाहिजे म्हणजे पाणी पातळी वाढेल. गेवराई तालुक्यात एकूण १ लाख ४७ हजार हेक्टर भौगोलिक क्षेत्र आहे. पेरणी लायक १ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्र असून गेवराई परीसरात मादळमोही , चकलांबा , रेवकी , तलवाडा , घाँडराई , पाचेगाव , उमापूर , जातेगाव , सिरसदेवी अशी दहा महसुली मंडळ आहेत. यंदा पाच सहा मंडळात चांगला पाऊस झाला आहे.
जूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. त्यामुळे, पेरणीची लगबग सुरू झाली. शेतकऱ्यांनी ऊसणवारी करून पेरणीसाठी बी - बियाणे , खते , लागवड आदीवर मोठा खर्च केला असताना संक्रांत येते की काय ? या चिंतेत सध्या शेतकरी राजा दिसून येत होता.ऑगस्ट चा महिन्यात जवळपास वीस दिवस पाऊस गायब झाला होता. त्यामुळे,
वेळेवर पाऊस पडला तर ठिक नसता कोरडवाहू भागातील पिके पूर्णत: धोक्यात आली होती. सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावून तालुक्यातील पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकरी सुखावल्याचे चित्र आहे. कापूस,ऊस, बाजरी ची
पिके तरारून गेली आहेत. गेवराई तालुक्यात मुग पिकाचे खळेदळे सुरू आहेत.