आखिल भारतीय मराठा महासंघ दुर्गाउत्सव कार्यकारणी जाहीर
गेवराई प्रतिनिधी
अवघ्या काही दिवसावर म्हणजेच दि.26 सप्टेंबर 2022 रोजी घटस्थापनेने नवरात्र उत्सवास प्रारंभ होत आहे.दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आखिल भारतीय मराठा महासंघ दुर्गा उत्सव समितीची येथील छत्रपती मल्टीस्टेट या मुख्य शाखेत बैठक पार पडली.या बैठकीस मार्गदर्शक मा.उपनगराध्यक्ष राजेंद्र भंडारी तसेच संस्थापक अध्यक्ष संतोष भंडारी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी उपस्थित सदस्यातून अध्यक्ष म्हणून श्री.कैलाश औटी उपाध्यक्ष म्हणून एकनाथ लाड,ॠतिक कदम,सचिव पदी गजानन पांडे,सहसचिव विशाल नन्नवरे,तर कोषाध्यक्ष म्हणून शिवनाथ परळकर यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.तर प्रविण मुळे,गणेश दायमा,बाळू धुरंधरे,शुभम वाघमारे सलीम शेख यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.यावेळी बैठकीस जेष्ठ सदस्य अशोक गायकवाड,बंडू दाभाडे,सचिन खापे,राजू गायकवाड,गणेश दाभाडे,विष्णू वाघमारे,अशोक राऊत,दस्तगीर शेख यांची उपस्थिती होती.कार्यक्रमांचे प्रस्ताविक व आभार प्रदर्शन आविनाश माळवदे यांनी केले.