विश्वकर्मा वंशिय समाज संघटन च्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी दिलीप सोनवणे यांची फेरनिवड
गेवराई प्रतिनिधी
विश्वकर्मा वंशिय समाज संघटना हि अवघ्या महाराष्ट्रात संघटन क्षेत्र व सामाजिक कार्यात अग्रेसर आहे.सन २0१५ च्या विश्वकर्मा वंशिय समाज जनजागृती रथ याञा संबंध महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातुन भगवान विश्वकर्मा यांची रथ यात्रा काढण्यात आली होती. ३मे ते ३ जुन अशा पद्धतीने एक महिना विश्वकर्मा वंशिय समाज संघटन चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रा नागोजीराव पांचाळ सर यांच्या संकल्पनेतून हि जनजागृती अभियान रथयात्रा राबविण्यात आली होती.
या नंतर ५ जुलै २०१५ रोजी छञपती संभाजी नगर येथे सर्व स्तरावरील समाज बांधवांना विचारात घेऊन विश्वकर्मा वंशिय समाज संघटन ची स्थापना झाली या वेळी सामाजिक क्षेत्रात सतत काम करणारे गेवराई तालुक्यातील सामान्य कुटुंबातील दिलीप सोनवणे यांना महाराष्ट्र राज्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले होते... या वर्षी १७ रोजी भगवान विश्वकर्मा यांच्या प्रकट दिन छञपती संभाजी नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाण वेरूळ ( विलोढगढ ) येथे प्रतिवर्षा प्रमाणे मोठ्या थाटामाटात हा प्रकट दिन सोहळा पार पडला...
या सोहळ्याची सांगता झाल्यानंतर विश्वकर्मा वंशिय समाज संघटन मधे फेरबदल करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून हिंगोली चे सुवर्णकार समाज बांधव मा बजरंग खर्जुले यांची निवड करण्यात आली त्याच बरोबर महाराष्ट्र राज्य सचिव म्हणून गेवराई तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते दिलीप सोनवणे यांची परत एकदा फेरनिवड करण्यात आली, तर नांदेड येथील पाथरवट समाज बांधव आदरणीय बालाजी खरडे पाटील यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात आली..
या वेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नागोजीराव पांचाळ दिलीप सोनवणे यांच्या कार्यावर विश्वास ठेवत परत फेरनिवड केल्या बद्दल आभार मानले व येणाऱ्या कार्य काळात पुन्हा विश्वकर्मा वंशिय समाज संघटन ची ताकद वाढविण्यासाठी मी कटीबद्ध राहिल असे आश्वासन देऊन आभार व्यक्त केले....
या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील समाज बांधव व पदाधिकारी मोठ्या संख्येने वेरूळ येथील कार्य क्रमास उपस्थित होते. ....