आगळावेगळा वाढदिवस
आष्टी प्रतिनिधी
वाढदिवस म्हटलं की लहान मुलांना पिझ्झा, बर्गर,चॉकलेट,केक याचं भलतच आकर्षण असतं.परंतु आष्टी येथील हंबर्डे महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रा. आनंद देशमुखे यांच्या अजिंक्य या मुलाने वाढदिवसाच्या निमित्ताने, स्ट्रॉबेरी फळाने सर्वांगा भोवती, रंगीबेरंगी कागदी आवरणात स्वतः ला गुंफून घेतले आहे. जनु केक,पिझ्झा,बर्गर,चॉकलेट या मधून बाहेर पडावे.आणि फलाहाराला अधिकाधिक महत्त्व द्यावे.असा संदेशच दिलेला आहे. अजिंक्यचा असा हा आगळावेगळा वाढदिवस कुतूहलाचा विषय झाला आहे.