महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

कालीका माता ज्योतीचे गेवराई शहरात स्वागत

कालीका माता ज्योतीचे गेवराई शहरात स्वागत
----------------------------------------


 गेवराई (प्रतिनिधी) विश्वकर्मा वंशिय समाज मनु (लोहार) मय ( सुतार  ) त्वष्टा (तांबटकर) शिल्पी(पाथरवट) दैवज्ञ (सोनार) समाजाचे आरध्य दैवत कर्नाटक राज्यातील शिरसंगी येथील कालीका माता मंदिर ते वेरुळ ( विलोडगढ) जि. छत्रपती संभाजीनगर येथे भगवान विश्वकर्मा यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या पुण्य भुमी मध्ये सन 2015 पासून भगवान विश्वकर्मा पुजनदीन विश्वकर्मा वंशिय समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

त्या निमित्ताने कराड येथील आदरणीय धनाजीराव सुतार व त्यांचे सहकारी अर्जुनरावजी सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली शिरसंगी ते वेरूळ दि 11 सप्टेंबर रोजी ज्योत घेऊन आले असता  एकुण साडेसातशे कि. मी. चा प्रवास पार करत हि ज्योत 17 सप्टेंबर रोजी वेरूळ येथे भगवान विश्वकर्मा पूजन दिन साजरा करुन या ठिकाणी समारोप होणार असून प्रतिवर्षी वेरूळ येथे विश्वकर्मा समाज या ठिकाणी मोठ्या उत्साहात पुजन दिन साजरा करत आहे, या दिवशी मोठ्या प्रमाणात समाज एकञ येत आहे.

 शिरसंगी कर्नाटक येथुन निघालेली ज्योत गेवराई येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ज्योतीचे स्वागत करण्यात आले.या वेळी  विश्वकर्मा वंशिय समाजाचे गेवराई तालुका अध्यक्ष अशोकराव गायकवाड, दादासाहेब गिरी, दादासाहेब चौधरी,युवा व्याख्याते आदरणीय रामानंद तपासे, दिलीप सोनवणे, शिवाजी झेंडेकर सर, यांनी ज्योतीचे आयोजक आदरणीय धनाजीराव सुतार या सर्वांचे गेवराई शहरातील बांधवांनी स्वागत केले,व भगवान विश्वकर्मा मंदिर पांढरवाडी फाटा येथील मंदिरात भगवान विश्वकर्मा यांची आरती करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या वेळी विश्वकर्मा वंशिय समाज संघटन चे ता उपाध्यक्ष बाबासाहेब सांगुळे , नवनाथ सांगुळे,भास्कर गायकवाड , अशोक सांगुळे, महेश नंन्नवरे, नितीन गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, लहु सोनवणे, राजु गायकवाड, बाळासाहेब पांचाळ, गणेश पांचाळ, नंदु शिंदे, अक्षय गायकवाड, कॄष्णा सुधाकर गोरे. गणेश पंडित.सांगुळे,पत्रकार सुनील पोपळे. यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.