कोल्हेरच्या शेतकरी कुटुंबातील कृष्णा यादवची आय.आय. टी (IIT) साठी वाराणसी येथे निवड
--------------------------------
गेवराई (प्रतिनिधी) तालुक्यातील कोल्हेर येथील शेतकरी कुटुंबातील
कृष्णा यादव याने कठोर मेहनत घेऊन अभ्यास करत आयआयटी प्रवेश पूर्व परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून आयआयटी साठी त्याची वाराणसी येथे निवड झाली आहे. तर या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कृष्णा हा कोल्हेर येथील प्रगतशील शेतकरी एकनाथ केशवराव यादव यांचा मुलगा व माजी पं.स. सदस्य अशोक गंगाराम पवार चव्हाणवाडी यांचा भाचा आहे. कृष्णाचे प्राथमिक शिक्षण हे श्रीरामपूर येथील रामराव अधिक पब्लिक स्कूल व उच्च माध्यमिक शिक्षण जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ तलवाडा व नाशिक येथे झाले. यानंतर त्याने येवला येथील एस.एन.डी. कॉलेज ऑफ फार्मसी येथे पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आयआयटी मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी लागणाऱ्या प्रवेश परीक्षा GPAT 2022 मध्ये देशातून (AIR) 204 नंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (NIPER2022) मध्ये देशातून AIR-259,व त्यानंतर आयआयटी वाराणसी मध्ये देशातून AIR-29 वा तर खुल्या प्रवर्गातून देशातून 4 चौथा येण्याचा मान मिळवला. या यशासाठी त्याने दिवसरात्र मेहनत व शिक्षकांचे मार्गदर्शन घेत हे यश मिळवले असून या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.