हनुमंत आगरकर यांचा अपघाती मृत्यू
-------------------------------
रिक्षाला ट्रॅव्हल्सने चिरडले
---------------------------------
गेवराई (शुभम घोडके) आरणहून गायकवाड जळगाव येथे ज्योत घेऊन जाणार्या भावीकांच्या रिक्षाला ट्रॅव्हल्सने पहाटे तीन वाजता जोराची धडक दिली. या अपघातात एक जण ठार तर नऊ जण जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील हिरापूर जवळील ईटकूर फाट्यावर घडली.
गेवराई तालुक्यातील गायकवाड जळगाव येथील काही भावीक आरणहून आपल्या गावाकडे ज्योत घेऊन जात होते. पहाटे तीन वाजता भावीकांच्या रिक्षाला ट्रॅव्हल्स (क्र. एम.एच. 20 ई.जी. 0055) ने जोराची धडक दिली. या अपघातात हनुमंत अण्णासाहेब आगरकर (वय 42 वर्षे) हे जागीच ठार झाले तर विश्वंभर देवीदास अंतरकर, शैलेष जानकीराम कातखडे, ऋषिकेश परमेश्वर आगरकर, महादेव बबन जावळे, परमेश्वर पांगरे, रविराज भाऊसाहेब आगरकर, गजानन बंडु वाघमारे, नंदू भाऊसाहेब आगरकर, बाळू भारत आगरकर हे जखमी झाले. जखमींना बीड शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.