गेवराई शहरात युवकाचा खून
गेवराई प्रतिनिधी : दोन गटात झालेल्या भांडणात एका युवकाचा खून झाल्याची घटना बुधवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली असून, घटनेचे नेमके कारण समजले नाही. पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, सदरील घटना संजयनगर भागातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दोन गटात किरकोळ कारणावरून भांडण झाले. भांडणातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली असून, या घटनेत मयत बाबू शिवराम शेलुरे, ( वय वर्ष २४ ) या युवकाचा खून झाल्याचे समजते. दरम्यान, बाबू शेलुरे या युवकाला तिघांनी मिळून मारहाण केल्याची चर्चा आहे.