अमृत महोत्सवाने दिली गेवराईकरांना शाश्वत सावली
गेवराई प्रतिनिधी
स्वातंञ्याचा अमृत महोत्सव संपन्न होत असतांना श्री चिंतेश्वर विद्यालय अमृत महोत्सव समितीच्या विद्यमाने अमृत महोत्सव वर्षाची कायम आठवण करुन देणारा उपक्रम आज *श्री चिंतेश्वर विद्यालयात वृक्षरोपन व संवर्धन संकल्प कार्यक्रम* अंतर्गत राबवण्यात आला.
सदरील कार्यक्रमासाठी मा.श्री.प्रमोदजी कुलकर्णी,मा.श्री.नितीनजी डोळे,मा.श्री.दत्ताजी पत्की,श्री.प्रशांतजी रुईकर,द्वैय मुअ श्रीम. सुषमाजी मोरगांवकर,श्रीम.सारीकाजी कुलकर्णी,वृक्ष बीसी समितीच्या डाॅ.सौ. सीमा जोशी, डाॅ.अंजली नाईकवाडे,डाॅ. श्रीम बारकुल व अन्य वृक्ष बीसी सदस्य तसेच अमृत महोत्सव समितीचे सर्व सभासद यांची विशेष उपस्थिती होती.
अमृत महोत्सव समिती अंतर्गत वर्षभर घेण्यात आलेल्या विविध वैविध्यपूर्ण उपक्रमातील वृक्षारोपन व संवर्धन हा एक विशेष उपक्रम आहे.यामध्ये *भविष्याचा विचार करुन शालेय परिसर व मन्यारवाडी रोड या मार्गावर वृक्षारोपन करुन त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला*.
प्रसंगी प्रास्ताविकातुन श्री पत्कीजी यांनी पर्यावरणप्रती कृतज्ञेचा भाव जपत तन मन धनाने मातृभूमीस दिलेली एक मानवंदना असणारा हा उपक्रम असल्याचे स्पष्ट केले. तर डाॅ. नाईकवाडे यांनी वृक्षप्रेमी पिढ्या घडवल्या जाव्यात अशी अपेक्षा त्यांच्या मार्गदर्शनातुन व्यक्त केली.तसेच कृतीयुक्त संदेश देत डाॅ. बारकुल यांनी वृक्ष बीसी संकल्पना स्पष्ट करत विद्यालयाच्या वृक्षसंवर्धनाच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलतांना श्री कुलकर्णी सरांनी अमृत महोत्सव समिती उपक्रमास ७५ वृक्षरोपे देवुन सहकार्य करणार्या वृक्षबीसी महिला संघाच्या कार्याचे स्वागत करत आपण एकाच मार्गाचे पाईक असुन विद्यालयाच्यावतीने वृक्षरोपे संवर्धन कार्यात कोणतीच कसुर न होता त्याचे पूर्व व पूर्ण नियोजन झालेले असल्याचे स्पष्ट केले.सदरील उपक्रमासाठी संस्थेचे कार्यवाह डाॅ. श्री हेमंतजी वैद्य यांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या.