महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

प्राचार्य डॉ.निंबोरे,प्रा.भा.दे.जगताप यांच्या मार्गदर्शनाने योग दिन साजरा

प्राचार्य डॉ.निंबोरे,प्रा.भा.दे.जगताप यांच्या मार्गदर्शनाने योग दिन साजरा     


 आष्टी प्रतिनिधी 

आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयात प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे,प्रा.भा.दे.जगताप यांच्या मार्गदर्शनाने योग दिन साजरा करण्यात आला.यावेळी प्रा.जगताप म्हणाले,पाचवा वेद म्हणून आयुर्वेद महत्त्वाचा आहे.पतंजलीच्या रुपाने हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या ग्रंथसंपदेतून  याचा अभ्यास होतो.सुखी आणि निरोगी आयुष्यासाठी योग महत्वाचा आहे.मनावर ताबा ठेवण्यासाठी प्राणायाम महत्त्वाचा आहे.प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे म्हणाले,365 दिवस योगासन,प्राणायाम, ध्यान साधना महत्त्वाची आहे.परदेशात याचा अभ्यास केला जातो.आजीबाईचा बटवा आज गायब झाला.हा जडीबुटीचा आयुर्वेद खजिना नामशेष झाला आहे.आपले आयुष्य धोक्यात आले आहे.डॉ.सुहास गोपने यांनी सूत्रसंचालन केले.डॉ.अभय शिंदे यांनी आभार मानले.