महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

योग ,मेडिटेशनमुळे विद्यार्थ्यांच्या शरीराबरोबर मेंदूचे आरोग्य सुधारतं : प्रा. आर. के. चाळक

योग ,मेडिटेशनमुळे विद्यार्थ्यांच्या शरीराबरोबर मेंदूचे आरोग्य सुधारतं : प्रा. आर. के. चाळक
----------------------------------
आर. के. पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा
------------------------------
गेवराई ( प्रतिनिधी ) 
वर्षानुवर्षं ध्यानधारणा करणाऱ्या बौद्ध भिख्खूंच्या अभ्यासातून ध्यानधारणेमुळे मेंदूचे झालेले परिवर्तन आणि याच परिवर्तनाचा झालेला अविष्कार आपण पाहात आहोत. 
शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे. योग ,मेडिटेशनमुळे शरीराबरोबर मनाचं आरोग्य सुधारतं असे प्रतिपादन प्रा. आर. के. चाळक यांनी आर. के. पब्लिक स्कूल आयोजित शिबीरामध्ये केले. रोग निवारणाच्या या पद्धतीला आता आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळाल्याने संयुक्त राष्ट्राने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’  म्हणून घोषित केला आहे. योग दिनानिमित्त आर. के. पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पार्थ प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक सचिव आर. के. चाळक  यांच्या हस्ते दीप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी आर. के. चाळक , सौ. योगिता चाळक , प्राचार्य गणेश चाळक , उपप्राचार्य  वेणू टी , रहीम शेख , सुप्रिया जाधव , व सर्व शिक्षक वृंद उपस्थितीत होते. सर्व विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार करत योगा दिनाची सुरुवात केली. नंतर विद्यार्थ्यांनी योगा वर आधारित एक नृत्य सादर केले. इयत्ता पाचवी ते सातवी या वर्गातील  विद्यार्थ्यांनी योगावर आधारित मंत्र म्हणले. तसेच 21 जून हा संगीत दिवस असल्यामुळे शाळेमध्ये संगीत दिवस हि साजरा करण्यात आला .विद्यार्थ्यांनी संगीत दिवसाचे औचित्य  साधत आपल्या विविध कलागुणांचे प्रदर्शन केले. योगाद्वारे आपण आपले शरीर, मन यावर ताबा ठेवू शकतो व जीवन सुखकारक करू शकतो असा संदेश प्राचार्य वेणू टी यांनी दिला. शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे, असा सल्ला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिला. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी  उभ्या, बठय़ा आणि निद्रा स्थितीतील ताडासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोनासन, भद्रासन, शशांकासन, वक्रासन, भुजंगासन, शलभासन, मक्रासन, सेतुबंधासन, शवासन, कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी, ध्यान आदी योगासनांचे प्रकार केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका स्वाती कापसे व सौ. सुप्रिया जोशी यांनी केले. सौ .सुप्रिया तनपुरे यांनी सर्वांचे आभार मानत कार्यक्रमाचा समारोप केला.