महिलांचा सन्मान वाढविणारा निर्णय..!
(अग्रलेख साप्ताहिक प्रकाश आधार )
सामाजिक सुधारणेचे व्रत स्वतःच्या हाती घेऊन अनेक महात्म्यांनी, सुधारकांनी आपले स्वतःच
आयुष्य कोरून समाजातल्या काही कुप्रथा, चालीरीतींना मुठमाती दिली. परंतू , समाज एवढ्या लवकर बदलत नसतो. काळ वेळ निघून गेल्यावर, काही गोष्टी पटायला लागतात. विवेक जाग्यावर येतो आणि मग, अरे हो..! हे तर अजिबात योग्य नाही. हे चुकीचे आहे. आपण बदलले पाहिजे. सकल मानव जातीच्या विकासासाठी बदल गरजेचा असतो. असाच एक चांगला निर्णय घेऊन सरकारने इतिहास निर्माण करून महाराष्ट्रातील महिलांचा सन्मान वाढविला आहे. लगेच त्याची सुरूवात होईल. बदल दिसतील. असे मानायची गरज नाही. तशी अपेक्षा ही नाही. पण, हा निर्णय किती योग्य आणि समर्पक आहे. याची जाणीव हळूहळू होत जाईल आणि "विधवा" म्हणून सावित्रीच्या नशीबी आलेला हा कलंक पुसला जाईल, एवढे निश्चित वाटते. म्हणून, आपण या क्रांतीकारी निर्णयाचा आदर करून त्याचे स्वागतच केले पाहिजे.
कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव मंजूर केल्यानंतर, या आदर्श आणि विवेक वादी निर्णयाचे स्वागत करून महाराष्ट्र राज्य सरकारने सदरील
पॅटर्नची राज्यभर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतसुखदधक्कादिलाआहे. . महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंद करण्यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श समोर ठेवून कार्य करावे असे आवाहन करणारे परिपत्रक राज्य सरकारकडून जारी केले आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या हेरवाड ग्रामपंचायतीने ही अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ठराव ग्रामसभेमध्ये मांडून विधवा प्रथेला मूठमाती दिली होती. हेरवाडप्रमाणे राज्यातील अन्य ग्रामपंचायतीनी याचे अनुकरण करून तसा ठराव ग्रामसभेने करण्याचे आवाहन ना. मुश्रीफ यांनी केले. त्यांचे ही आभार मानले पाहिजेत. हेरवाड ग्रामपंचायतीने ५ मे २०२२ रोजी विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे. पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे , गळ्यातील मंगळसूत्र तोडणे , हातातील बांगड्या फोडणे , पायातली जोडवी काढणे , यासारख्या प्रथांचे काही समाजात आजही पालन केले जाते. ही अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्धार कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्राम पंचायतीने करून, एक पाऊल पुढे टाकले आहे. आता महाराष्ट्र राज्य सरकारने, या निर्णयाला राज्यभर लागू करण्याचे धोरण जाहीर करून तमाम विधवा माय माऊल्यांना न्याय दिला आहे. महिलांचा सन्मान वाढविणारा निर्णय..!
सामाजिक सुधारणेचे व्रत स्वतःच्या हाती घेऊन अनेक महात्म्यांनी, सुधारकांनी आपले स्वतःच
आयुष्य कोरून समाजातल्या काही कुप्रथा, चालीरीतींना मुठमाती दिली. परंतू , समाज एवढ्या लवकर बदलत नसतो. काळ वेळ निघून गेल्यावर, काही गोष्टी पटायला लागतात. विवेक जाग्यावर येतो आणि मग, अरे हो..! हे तर अजिबात योग्य नाही. हे चुकीचे आहे. आपण बदलले पाहिजे. सकल मानव जातीच्या विकासासाठी बदल गरजेचा असतो. असाच एक चांगला निर्णय घेऊन सरकारने इतिहास निर्माण करून महाराष्ट्रातील महिलांचा सन्मान वाढविला आहे. सरकारने एक कृती करून संधी दिली आहे. सकल समाजाने या सुधारणावादी पाऊल वाटेवर उभे राहून या निर्णयाला पाठिंबा द्यावा, म्हणजे या निर्णयाचे फलित म्हणून विधवांना समाजात मान सन्मान मिळेल..! कारण, गाव खरा कारभारी आहे.
