गेवराईत श्रीमद् ज्ञानयज्ञ भागवत कथा व मातृपुजन सोहळ्याचे आयोजन
गेवराई (प्रतिनिधी) गेवराई येथील ग्रामदैवत असलेले चिंतेश्वर मंदिर गेवराई येथे ह.भ.प. दिलीप घोगे (बाबा) यांच्या मातोश्री पूजनीय रूक्मीनबाई घोगे (आईसाहेब)यांच्या वयाचे 101 वर्ष पूर्ण झाल्याचे पित्यर्थ निमित्ताने श्रीमद् ज्ञानयज्ञ भागवत कथा व मातृपुजन सोहळा आयोजित करण्यात आला असून
कथा प्रवक्ते श्री नारायण महाराज गोसावी त्यांच्या अमृतवाणीतून 17 मे रोजी प्रारंभ होणार असून
कथेची वेळ सायंकाळी सात ते दहा या वेळेत कथा होणार आहे
कथा महात्म्य ,गोकर्ण कथा, मूळ कथा प्रारंभ, तथा परीक्षित महाराजांचं पूर्व चरित्र, कपीलोपदेश जड, भारत अख्याण, जळमेळ कथा, नरसिंह जन्म, प्रल्हाद स्तुती, गजेंद्र कथा, समुद्रमंथन, श्री राम अवतार, श्रीकृष्ण जन्म, श्रीकृष्ण लिला,पुतना उद्धार, गोवर्धन कथा, भगवंताचा विवाह(मातृ पूजन सोहळा तुलदान) अशा विविध कथेच श्रवण त्या ठिकाणी सांगण्यात येणार आहे गेवराई येथील भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन चिंतेश्वर संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. दिलीप( बाबा) घोगे यांच्या वतीने करण्यात आले आहे
