महाशिवरात्री निमित्त किशोर नाना हंबर्डे यांच्या निवासस्थानी भजन संध्या संपन्न
आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे यांच्या रिद्धीसिद्धी निवास स्थानी दिनांक 01 मार्च रोजी रात्री महाशिवरात्री निमित्त संगीत विशारद आदिनाथ औटी गुरुजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यासह भजन संध्या कार्यक्रम संपन्न झाला.संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,संत नामदेव यांच्या रचना सह, हिंदी मराठीतील आधुनिक अभंगांना या भजन संध्या मध्ये गायले गेले. तळेकर आप्पा, सतीश दळवी गुरुजी,रमेश कटके, विक्रम बडे,अशोक टकले,शशिकांत खाडे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माहिती पटातील मोरोपंतआर्याचे गायक संजय ससाने,प्रा.विक्रम खेडकर,संगीत विशारद विशाल चव्हाण यांनी रंगत आणली.यावेळी कवी प्रा.सय्यद अलाऊद्दीन यांच्या झिंदाबाद मुर्दाबाद कवितासंग्रहाची तिसरी आवृत्ती संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे यांना सप्रेम भेट देण्यात आली.यावेळी देविदास आबा धस,राष्ट्रवादीचे नेते,अण्णासाहेब चौधरी, अतुल शेठ मेहेर,डॉ.गणेश पिसाळ,
महेश चौरे,काकासाहेब शिंदे,डॉ.सोपानराव निंबोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
