गेवराईत आज रामायणाचार्य ह.भ.प समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन.
-------------------------
पद्मश्री नीलिमा मिश्रा व बीजमाता राहीबाई पोपरे यांच्या हस्ते होणार कर्तृत्ववान व्यक्तीच्या मातांचा गौरव
----------------------------------
शुभम घोडके/ गेवराई
गेवराई (प्रतिनिधी) संत भगवान बाबा व संत वामनभाऊ यांच्या पुण्यस्मरणार्थ संस्कृती प्रतिष्ठान आयोजित सत्संग कीर्तन सोहळ्यात आज सायं. 6 वा. तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तुत्ववान व्यक्तीच्या मातृपूजन सोहळा संपन्न होणार असून आज सायंकाळी 9ते 11 या वेळेत रामायणाचार्य ह भ प समाधान महाराज शर्मा यांचे हरिकीर्तन होणार असून सर्व भाविकांनी कोविड नियमाचे पालन करत या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन अयोजन समितीच्या वतीने अध्यक्ष अरुण मस्के व कार्यवाहक महादेव चाटे, मगण दायमा यांनी केले आहे.
शहरातील संत गजानन महाराज मंदिर येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कीर्तन सोहळ्यात आज ह. भ .प. रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा यांचे किर्तन होणार असून यामध्ये मातृपूजन सोहळा पद्मश्री नीलिमा मिश्रा व बीजमाता राहीबाई पोपरे यांच्या हस्ते संपन्न होणार असून यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जि.प.अध्यक्षा शिवकन्या सिरसाठ, साध्वी सोनाली करपे, उद्योजिका प्रगती घुगे अंबरवाडीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दरम्यान या कार्यक्रमात आदर्श माता म्हणून श्रीमती शोभा विठ्ठल साखरे, सौ.कुसुम शहादेव ढाकणे, सौ. प्रभादेवी भिकुराव सोनी, श्रीमती लक्ष्मीबाई बसवंत भंडारी, श्रीमती इंदूबाई श्रीराम काळम, सौ.गुलाबताई भरत लोळगे, श्रीमती सिंधू गणेश बेदरे, श्रीमती शांताबाई बालाजी भालशंकर, सौ.भागीरथी बाबुराव खरात, सौ.असराबाई वैजीनाथ व्हरकटे, सौ.सुंदराबाई अच्युत सुतार यांच्यासह आदींचा मातृपूजन गौरव करण्यात येणार असून सर्व भाविकांनी मास्क लावून कोविडच्या सर्व नियमाचे पालन करत
या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे अवाहन सत्संग कीर्तन सोहळ्याचे अध्यक्ष अरुण मस्के, महादेव चाटे, मगण दायमा यांच्यासह आदींनी केले आहे.
