तिप्पटवाडी येथे होणारा कीर्तन महोत्सव सोहळा रद्द:- ह.भ.प. गुरूवर्य भारती महाराज
गेवराई ( प्रतिनिधी) बीड तालुक्यातील तिप्पटवाडी येथे होणारा पंचक्रोशी पंचकुडात्कम शतचंडी योग व कीर्तन महोत्सव सोहळा दिनांक 23/ 1/ 22 ते 30/ 1/ 2022 या कालावधीत संपन्न होणार होता परंतु कोरोना सारख्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात येत असून अशी माहिती श्री क्षेत्र रामचंद्र महाराज संस्थान तिपटवाडी संस्थानचे मठाधिपती ह भ प गुरुवर्य रामानंद महाराज भारती यांनी दिली आहे तसेच याची नोंद सर्व पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावी
