महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

लालजी भाई देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात फळवाटप कार्यक्रम

लालजी भाई देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात फळवाटप कार्यक्रम
-------------------------------------------------------
          गेवराई (प्रतिनिधी)  - अखिल भारतीय कॉंग्रेस सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी भाई देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांच्या आदेशानुसार १५ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
          त्याचाच भाग म्हणून गेवराई शहरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप आणि आदिवासी पारधी समाजातील गरजू्वंताना मोफत किरणा साहित्याचे वाटप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे प्रदेश सचिव तथा महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष कडुदास कांबळे, युवक काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. श्रीनिवास बेदरे, अॅड. सुभाष निकम, सेवा दलाचे गेवराई तालुका अध्यक्ष तुकाराम खरात, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. 
         या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा समितीचे पदाधिकारी बीड जिल्हाध्यक्ष सोनाजी कांबळे, महिला जिल्हा अध्यक्ष रितू भोसले, जिल्हा उपाध्यक्ष शेषराव सदाफुले, गेवराई तालुका अध्यक्ष विनोद कांबळे, गेवराई शहराध्यक्ष शेख मुसा, सचिन सुतार, महेश धुरंधरे, जितू इंगोले यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी सरकारी दवाखान्यातील डॉक्टर, नर्स आणि रुग्णाचे नातेवाईक हजर होते. यावेळी लालजी भाई देसाई यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी अभिष्टचिंतन करण्यात आले.