सलून ब्युटीपार्लर व्यावसायिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू
मुंबई प्रतिनिधी
सलून ब्युटीपार्लर असोसिएशन महाराष्ट्र तर्फे स्ट्रीक्स कंपनी प्रायोजित ठाणे शहरातील पुर्वनोंदणी केलेल्या सलून ब्युटीपार्लर व्यावसायिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन 28 जुन 2021 रोजी मंगला हायस्कुल, ठाणे येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे व्यवस्थापन असोसिएशनच्या ठाणे कमिटीतर्फे महाराष्ट्र प्रभारी आणि सल्लागार श्री . उदयजी टक्के यांच्या मार्गदर्शनाखाली केले गेले होते. या शिबिरात 400 च्या वरती सलून आणि ब्युटी पार्लर व्यावसायिकांना लसीकरण करण्यात आले.
हेअर आणि ब्युटी क्षेत्रात 18 ते 44 वयोगटातील जास्त संख्येने व्यावसायिक आहेत त्यांचे सरकारने सांगितल्याप्रमाणे लवकरात लवकर लसिकरण करुन घेण्याच्या मुख्य उद्देशाने स्ट्रीक्स कंपनीने हा कार्यक्रम असोसिएशनच्या माध्यमातून घेतला होता.
सदर शिबिराचे उद्घाटन स्ट्रीक्स कंपनीचे मालक श्री. मनिषजी छाब्रा सर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे शहराचे महापौर श्री.नरेशजी म्हस्के ,आमदार श्री. निरंजनजी डावखरे आणि गटनेते श्री. दीलीपजी बारटक्के,मा. नगरसेवक श्री. लक्ष्मण टीकमाणी मा. नगरसेवक श्री. संजय दळवी, श्री. संदीपजी लेले तसेच नाभिक महासंघाकडून संस्थापक श्री. नरेशजी गायकर, नाभिक युवानेते श्री. महेशजी वाघ आणि मार्गदर्शक श्री. हेमंत बिडवई उपस्थित होते
महाराष्ट्र आणि मुंबई कमिटीकडून संस्थापक अध्यक्ष श्री.दत्तात्रय चव्हाण, उ.ध्यक्ष श्री .तुषार चव्हाण, ज.सेक्रेटरी श्री. किसनराव कोऱ्हाळे, कार्याध्यक्ष श्री. निलेश रणदीवे,सचिव श्री . दीपक यादव , मुंबई सचिव श्री. सचिनजी टक्के मुंबई उ.ध्यक्ष श्री. संदीप बदरीके, घाटकोपर शा.ध्यक्ष श्री.अनिल पवार,मुंबई स.सचिव श्री. संदीप चव्हाण , मुलुंड प्रमुख श्री.महादेव झेंडे हे उपस्थित होते.
सदर शिबिरासाठी ठाण्यातील प्रतिष्ठित व्यक्तीमत्व श्री. विनोदजी टीकमाणी आणि डाॕ.कामत व त्यांच्या टीमचे सहकार्य लाभले.