डॉक्टर शुभम तिडके याने मिळवले अंतिम परिक्षेत यश
गेवराई प्रतिनिधी
येथील नगर परिषदेचे जेष्ठ कर्मचारी विश्वांभर तिडके यांचा मुलगा डॉ. शुभम तिडके याने एमबीबीएस च्या अंतिम परिक्षेत यश मिळविले आहे. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. शुभम हा नाशिक येथील एस.एम.बी.टी. वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस चे शिक्षण घेत होता. अंतीम परिक्षेचा निकाल 26 एप्रिल 2021 रोजी जाहीर करण्यात आला असून, डॉ. शुभम विश्वांभर तिडके याने एमबीबीएस च्या अंतीम परिक्षेत 60% गुण मिळवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. चंपावती विदयालय, बीड येथील महाविद्यालयाचा तो माजी विद्यार्थी आहे. या यशाबद्दल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून, नातेवाईक, आप्तेष्ट मित्राकडून शुभम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, गेवराई येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे, कार्यालयीन अधीक्षक वाघ पाटील यांनी ही त्याचे कौतुक केले आहे.
