घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरी मोटरसायकल चोरांचा सुळसुळाट
नाशिक :
नाशिक शहरात मोटारसायकल चोरीचे प्रमाण अत्यंत वाढले आहे. रात्री तर चोरी होतेच, मात्र आता दिवसा ढवळ्या देखील पार्क केलेल्या दुचाकी चोरटे लंपास करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अंबड पोलिसांनी दोन संशयितांकडून अंबड, इंदिरानगर तसेच नाशिक ग्रामीण परिसरातून वेगवेगळ्या गुन्ह्यातील नऊ मोटरसायकली जप्त केल्याची माहिती आहे. या मोटरसायकली जवळपास तीन लाख 90 हजार रुपयांच्या असल्याचे समजते आहे. नाशिक शहरात मोटारसायकल चोरीचे प्रमाण अत्यंत वाढले आहे. रात्री तर चोरी होतेच मात्र आता दिवसा ढवळ्या देखील पार्क केलेल्या दुचाकी चोरटे लंपास करत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची उकल केली असून चार लाख रुपयांच्या नऊ मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत. नाशिक शहरातील फिर्यादी ओंकार राधाकिसन पेंढारकर यांचे फॅब्रिकेशन दुकान असून त्यांच्या यांनी दिलेल्या तक्रारीनुसार घरासमोर पार केलेली मोटरसायकल चोरून नेल्याची घटना काहि दिवसांपूर्वी घडली होती. या चोरीचा तपासाअंती अंबड पोलिसांनी जोरदार कामगिरी करत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर व नाशिक रोड परिसरात दुचाकी गाड्यांचे चोरी सातत्याने होत आहे. सदरचे चोरटे हे दुचाकी गाड्या चोरून कमी किमतीत ग्राहकांना विकत असल्याची गुप्त माहिती अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाला समजली. पथकाने तातडीने वरिष्ठाना याबाबत माहिती दिली. तसेच फिर्यादी ओंकार राधाकिसन पेंढारकर यांच्या तक्रारीनुसार तपास सुरु करण्यात आला. पोलिसांच्या पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी जाऊन सापळा सापळा रचला. या सापळ्यात संशयित सचिन अनिल हिरे, प्रमोद दिलीप बच्छाव यांच्याकडून चार लाख रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या एकूण नऊ मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत मोटरसायकल चोरणाऱ्या टोळ्या सक्रिय
नाशिक शहरासह नाशिकरोड, इंदिरानगर, सातपूर, नाशिक ग्रामीण या ठिकाणाहून दुचाकी गाडी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील काही महिन्यांत अनेक गुन्हे उकल झाले आहेत. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी अटक केलेल्या दोन अल्पवयीन मुलांसह व पंधरा संशयितांना अटक केली होती. त्यांच्याकडून चार लाख वीस हजार रुपये किमतीच्या एकूण नऊ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आजही अनेक दुचाकी चोरीच्या टोळ्या या शहरात पसरल्याचे यावरून दिसून येते.