आष्टी प्रतिनिधी
राज्यातील 18 वर्षावरील सर्व महिला,माता गरोदर स्त्रिया यांची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे.तसेच सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देणे. हे उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून आष्टी ग्रामीण रुग्णालय तथा ट्रॉमा केअर सेंटर,आष्टी.जि.बीड येथे,माता सुरक्षित तर घर सुरक्षित उपक्रम नवरात्र उत्सवात दिनांक 26 सप्टेंबर 2022 पासून 05 ऑक्टोबर पर्यंत 18 वर्षावरील महिला,गरोदर स्त्रिया यांच्या सर्वांगीन तपासणीसाठी आरोग्य तपासणी अभियानाचे उद्घाटन आष्टी ग्रामीण रुग्णालय तथा ट्रॉमा केअर सेंटर येथे सरपंच लोखंडे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.नगराध्यक्षा पल्लवी धोंडे कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या.या वेळी स्वप्नील धोंडे ही उपस्थित होते.या अभियानाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.वैद्यकीय अधीक्षक डॉ.राहुल टेकाडे,डॉ.ढाकणे,डॉ.खाडे मॅडम,डॉ.इम्राना मॅडम,डॉ.जावळे,परिसेविका बी.शेख,परिचारिका ए.बी.शेख,प्रतिभा गायकवाड,सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.जयचंद नेलवाडे यांनी सूत्रसंचालन केले.