छत्रपती मल्टीस्टेट देणार
गेवराई प्रतिनिधी
बँकिंग क्षेत्रात ग्राहकांची विश्वासार्हता मिळवलेल्या छत्रपती मल्टीस्टेट कडून खास नवरात्र उत्सवानिमित्त विशेष ऑफर देण्यात आलेली आहे.ज्यामध्ये फक्त 99 दिवसाच्या मुदत ठेवीवर आकर्षक 9% व्याजदर ही नवरात्रीच्या निमित्ताने नऊपट आनंद देणारी स्कीम जाहीर करण्यात आली आहे.या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन चेअरमन संतोष भंडारी यांनी केले आहे. सहकार क्षेत्रात ग्राहकांचा विश्वास आणि पारदर्शकतेने ग्राहकांची मने जिंकून अनेक शाखांचे जाळे विणणाऱ्या छत्रपती मल्टीस्टेट कडून विविध सण उत्सवात ग्राहकांसाठी मुदत ठेवीवर आकर्षक व्याजदर देणाऱ्या योजना लागू केल्या जातात.ज्यामध्ये राखी पौर्णिमा, गणेश उत्सव,गुढीपाडवा,दसरा, दीपावली या उत्सवात राबवलेल्या वेगवेगळ्या योजनेत असंख्य ग्राहकांनी प्रतिसाद देत आर्थिक फायदा करून घेतलेला आहे.याच गोष्टीची जाणीव ठेऊन छत्रपती मल्टीस्टेटने सध्या सुरू झालेल्या नवरात्र उत्सवानिमित्त विशेष योजना जाहीर केलेली असून ज्यामध्ये फक्त 99 दिवसाच्या मुदत ठेवीवर 9% व्याजदर देत आहेत.ही योजनेचा शुभारंभ घटस्थापने दिवशी म्हणजेच दि. 26 सप्टेंबर पासून होत असून ती योजना 5 ऑक्टोबरपर्यंत लागू असेल.अशी माहिती संस्थेचे चेअरमन संतोष भंडारी यांनी दिली. या आर्थिक फायदा देणा-या योजनेत जास्तीत जास्त ग्राहकांनी सहभाग नोंदवून आर्थिक फायद्यासह नऊपट आनंद घ्यावा असे आवाहन संस्थेचे चेअरमन संतोष भंडारी तथा छत्रपती मल्टीस्टेट परिवाराच्या वतीने करण्यात आलेले आहे.