गेवराई तालुका तलाठी संघटनेचे
अध्यक्ष पदी अशोक डरफे
गेवराई प्रतिनिधी
आज दिनांक 09/07/2022 रोजी तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर राख (तात्या ) यांच्या अध्यक्षतेखाली गेवराई तालुका संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली त्यामध्ये गेवराई तालुका संघटनेच्या अध्यक्षपदी अशोक डरफ़े तलाठी मादळमोही यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच सरचिटणीस पदी परमेश्वर काळे तलाठी पाचेगाव यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष अक्षय डोफ़े, शीला काळे, कार्याध्यक्ष अमोल कोंढरे, कोषाध्यक्ष सचिन खेत्रे, सहसचिव माणिक पांढरे तर सल्लागार म्हणून मंडळ अधिकारी अमोल कुरुळकर यांची निवड करण्यात आली सदर बैठकीस तलाठी संघटनेच्या राज्याचे माजी कोषाध्यक्ष अनिल सूत्रे साहेब, जिल्ह्याचे कोषाध्यक्ष केकान साहेब, कार्याध्यक्ष सचिन सानप तसेच गेवराई तालुक्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी उपस्थित होते.