महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त अवयव दान मोहिमेचा होणार शुभारंभ पूर्व तयारीच्या बैठकीत रणवीर पंडित यांनी नेत्रदानाचा केला संकल्प

अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त अवयव दान मोहिमेचा होणार शुभारंभ
=============
पूर्व तयारीच्या बैठकीत रणवीर पंडित यांनी नेत्रदानाचा केला संकल्प
=============
गेवराई, दि.२८ (प्रतिनिधी) माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, दि.३१ मे रोजी दुपारी १२ वाजता कृष्णाई येथे अवयव दान मोहिमेचा भव्य शुभारंभ होणार आहे. गेवराई शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. अवयव दान, नेत्रदान यांसह देहदान याबाबतची जनजागृती करून अधिकाधिक रुग्णांना जीवनदान मिळण्यासाठी अवयव दानाची मोहिम सुरु करण्याचा संकल्प रणवीर पंडित यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केला होता. त्यांची प्रेरणा घेवून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या बाबतच्या पूर्व तयारी बैठकीत रणवीर पंडित यांनी स्वतः नेत्रदनाचा संकल्प करून अधिकृत नोंदणी फॉर्म जिल्हा रुग्णालयाला सुपूर्द केला.

  राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना अनेकवेळा विविध उपक्रम आयोजित करताना केवळ दुसर्‍यांना उपदेश करण्याचे काम नेत्यांकडून होत असते मात्र अवयव दान सारख्या चळवळीमध्ये स्वतः पुढाकार घेवून पूर्व तयारीच्या बैठकीत नेत्रदानाचा संकल्प रणवीर पंडित यांनी केल्यामुळे या घटनेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त गेवराई शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अवयव दान मोहिमेचा शुभारंभ मंगळवार, दि.३१ मे रोजी दुपारी १२ वाजता आयोजित केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नेत्रदान, अवयव दान यांसह देहदानाच्या संदर्भाने जनजागृती करण्याचे काम करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या पूर्व तयारी संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीला रणवीर पंडित, भाऊसाहेब नाटकर, समुपदेशक तथा अवयव दान विभागाच्या समन्वयक चंद्रभागा गुरव, समुपदेशक अशोक मते, गेवराई शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा मुक्ता आर्दड यांच्यासह इतर उपस्थित होते.

  रणवीर पंडित यांनी त्यांच्या मातोश्रींना अज्ञाताकडून मिळालेल्या किडनीमुळे जीवनदान मिळाल्याच्या घटनेची प्रेरणा घेवून वाढदिवसानिमित्त अवयव दान मोहिम राबविण्याचा संकल्प केला होता. गेवराई शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने गेवराई तालुक्यात जनजागृती करण्याचा निश्‍चय करून पहिल्यांदाच सार्वजनिक स्वरुपात अवयव दान मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला. गंभीर आजारातील रुग्णांना जीवनदान मिळावे, अंधांना दृष्टी मिळावी यासाठी हा उपक्रम महत्वाचा असून सर्वांनी या उपक्रमात बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन रणवीर पंडित यांनी यानिमित्ताने केले. या बैठकीत अवयव दान विभागाच्या जिल्हा समन्वयक चंद्रभागा गुरव यांनी नेत्रदान, अवयव दान आणि देहदान या अनुषंगाने सविस्तर माहिती देवून सध्या बीड जिल्हा रुग्णालयात केवळ नेत्रदान करण्याची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती दिली. त्यामुळे रणवीर पंडित यांनी तातडीने नेत्रदानाचा अधिकृत शासकीय फार्म भरून तो याच बैठकीत जिल्हा रुग्णालयाकडे सुपूर्द केला. त्यामुळे त्यांचा आदर्श घेवून अनेकजण या मोहिमेत सहभाग घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.