महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

साहेब चषकाचे प्रथम विजेतेपद ए.एम. क्रिकेट क्लब ने पटकावले उप-विजेतापद मौलाना आझाद संघाने मिळवले

साहेब चषकाचे प्रथम विजेतेपद ए.एम. क्रिकेट क्लब ने पटकावले 

उप-विजेतापद मौलाना आझाद संघाने मिळवले

शुभम घोडके

गेवराई (प्रतिनिधी) अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसा निमित्त गेवराई शहरालगत असलेल्या दसरा मैदान वरती डे नाईट साहेब चषक स्पर्धा 2022आयोजित करण्यात आली असतांना साहेब चषक फायनल मॅच शुक्रवारी 27 मे रोजी संपन्न झाली या चषकात रंगतदार सामना म्हणून ए.एम. क्रिकेट क्लब विरुद्ध मौलाना आझाद क्रिकेट क्लब या संघामध्ये फायनल मॅच चा सामना रंगतदार झाला असुन तरी मौलाना आझाद क्रिकेट क्लब या संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डींगचा निर्णय घेतला ए.एम. क्रिकेट क्लब च्या संघाने प्रथम फलंदाजी करतांना 10 ओव्हरमधे 6 विकेटच्या नुकसानी वर 108 धावा केल्या यामध्ये नजीम सर यांनी 15 चेडुं मध्ये 7चौकार व 2 षटकाराच्या मदतीने 43 धावांचे मोठे योगदान त्यांनी दिले असुन त्यांना  शेख मोहसीन ,कृष्णा काकडे,कैलास, सौदरंमल यांनी धावा वाढवण्यासाठी चागंली मदत देखील केली मौलाना आझाद संघाच्या वतीने साजेद यांनीही 1 ओव्हर मध्ये 9 धावा देऊन 2 विकेट घेतल्या तर बाकीच्या बाँलरला ए.एम. क्रिकेट क्लब संघाच्या सर्वच फलंदाजाने सहजपणे लोळवले.

तसेच 108 धावांचा डोगंर उभा केला असता मौलाना आझाद क्रिकेट क्लब या संघाला विजयासाठी 109 धावांचे आवाहन दिले तरी मौलाना आझाद या संघाच्या वतीने प्रमोद रूडी 24 बाँलमधे 27 तर राजेंद्र कोल्हे 19 बाँलमधे 24 धावांचे योगदान दिले बाकी एकही फलंदाज मैदानावरती टिकाव धरू शकला नाही. तरी ए.एम क्रिकेट क्लब संघाच्या वतीने दुर्गादास खेत्रे यांनी 3 ओव्हरमधे 16  रन देऊन 3 विकेट घेतल्या तर कृष्णा काकडे यांनी 2 ओव्हरमधे 16 धावा देऊन 2 विकेट घेतल्या  सामन्यात या मौलाना आझाद संघ 10 ओव्हरमधे 9 विकेटच्या नुकसाणीवर फक्त 71 धावांच काढू शकला तरी हा सामना ए.एम क्रिकेट क्लब संघाने 37 धावांने दिमाखात दणदणीत विजय मिळवत यशाची गुढी गाठली.

ए.एम. क्रिकेट क्लब या संघासाठी कामगिरीत सातत्य अष्टपैलू खेळाडू नजीम सर यांना मँन आँफ द मँचचा पुरस्काराने  श्री.जयसिहं (भाऊ) पंडित यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला
साहेब चषकाचे विजेते ए.एम. संघाचे पाँन्सर अरूण मस्के व कृष्णा वादे आणि खेळाडु व उपविजेते मौलाना आझाद संघाचे पाँन्सर सय्यद एजाज व खेळाडु यांना  श्री‌.जयसिहं (भाऊ) पंडित तहसीलदार श्री.सचिन खाडे  यांच्या हस्ते ट्राँफी देऊन गौरव करण्यात आला बक्षीस वितरण 31 मे रोजी आयोजित केला असून प्रथम बक्षीस:-10,3333रु
द्वितीय बक्षीस:-51हजार 333रु आहे अशी घोषणा याप्रसंगी करण्यात आली यावेळी  मोठया संख्येने विविध क्षेत्रातील पदाधिकारी व खेळाडू व मॅच पाहण्यासाठी प्रेक्षकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
चौकट:- हार न मानण्याचा मनात निश्चय करून विजय संपादन केला क्रिकेट खेळणे प्रत्येकासाठी आव्हानात्मक‌ असतांना देखील
विजय सहजसोपा दिसतो, पण अनेक संकटांना मागे टाकून ए.एम. क्रिकेट क्लब च्या खेळाडूंनी आपली जिद्द आणि अखेरपर्यंत हार न मानण्याचा मनात निश्चय करून विजय संपादन केला हा विजय आमच्या सर्व खेळाडूंचा आहे.
  कृष्णा वादे
(ए.एम. संघाचे पाँन्सर)