श्रीमती छाया शिवनाथ मस्के यांना महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने राज्यस्तरीय महिलारत्न पुरस्कार जाहीर
------------------
गेवराई ( प्रतिनिधी )
जगदंबा नागरी सहकारी महिला पतसंस्था या बॅंकेच्या माध्यमातून कोरोना परिस्थिती केलेले सामाजिक कार्य तसेच विविध समाज हिताच्या कामाची दखल घेऊन श्रीमती छाया शिवनाथ मस्के यांना महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने राज्यस्तरीय महिलारत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला असून या पुरस्काराचे वितरण रविवार दि.29 रोजी शिर्डी येथील हाॅटेल शांतीसागर या ठिकाणी होणार आहे.
जगदंबा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गेवराई या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवनाथ मस्के यांच्या पत्नी छाया शिवनाथ मस्के यांनी या संस्थेच्या माध्यमातून देशात तसेच राज्यात उद्भवलेल्या कोरोना परिस्थितीचा सामना करण्यासाठी व माहामारीला हद्दपार करण्यासाठी सामाजिक जाणिवेतुन संस्थेच्या वतीने मुख्यमंञी साहयता निधीसाठी ३१००० दिले. त्यांच प्रमाणे कोरोना या विषाणुजन्य परिस्थितीत ही पतसंस्थेने मदतीचा हात पुढे करून बालाग्राम येथील अनाथ मुलांना किराणा साहित्य दिले. त्याच प्रमाणे दहा गरजवंत विधवा महिला शोधून त्या महिलांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी प्रत्येकी दोन हजार रूपये महिणा या पतसंस्थेकडून वर्षा काठी 2 लाख 40 हजार रू. देण्यात येते. हे सर्व कार्य समाज हिताचे असून यापुढे ही या जगदंबा नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्य जोमात सुरू आहे. त्यांनी गेवराई तालुक्यातील गुंतेगाव, कटचिंचोली व लुखामसला या गोदावरी नदी पट्टयावरील व उजव्या कालवा जाणाऱ्या या तीन गावातील शेतकऱ्यांचे कोरोना परिस्थित उत्पन्न वाढीसाठी हातभार लागावा या हेतूने या भागातील 30 शेतकऱ्यांना पशुधन खरेदीसाठी जगदंबा महिला नागरी सहकारी पतसंस्थाने 50 लाख रूपयांचे अर्थ साहाय्य केले आहे. यातून शेतकऱ्यांनी पशुधन खरेदी केले असून, या पैशातून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केल्याने त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. शिवाय यामुळे त्यांच्या संसालाला आर्थिक मदत ही होत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे, कोरोना परिस्थिती सामाजिक कार्य करणे त्यांच प्रमाणे समाजातील पाच विधवा महिलांसाठी रूपये दोन हजार रुपये अर्थ साह्य करणे हे सामाजिक व सामाज उपयोगी कार्य पाहता श्रीमती छाया शिवनाथ मस्के यांना महाराष्ट्र पत्रकार परिषदेच्यावतीने राज्यस्तरीय महिलारत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला असून या पुस्तकाचे वितरण रविवार दि.29 रोजी शिर्डी येथील हाॅटेल शांतीसागर या ठिकाणी होणार असून त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
