महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

अंतरवालीकरांना मधुकर मस्के यांच्या रूपानेकोहिनूर हिरा मिळाला -- बदामराव पंडित

अंतरवालीकरांना मधुकर मस्के यांच्या रूपाने
कोहिनूर हिरा मिळाला -- बदामराव पंडित

गेवराई ( प्रतिनिधी ) गावाच्या विकासासाठी आणि ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी युवकांनी पुढे येण्याची गरज आहे. कित्येक तरुण आज राजकारणात येऊन समाजाची सेवा करत आहेत. प्रत्येक वेळी गावाच्या विकासासाठी  तळमळीने काम करणारे मधुकर मस्के हे अंतरवालीकरांना मिळालेला कोहिनूर हिरा आहे, असे नेतृत्व गावकऱ्यांनी जपले पाहिजे असे प्रतिपादन शिवसेना नेते, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी केले आहे.
    गेल्या अनेक वर्षापासून आंतरवाली ते बागेवाडी या रस्त्याची शेतकऱ्यांची मागणी होती परंतु सदर रस्ता होत नसल्याने अनेक अडचणींचा सामना येथील ग्रामस्थांना करावा लागत होता, याची दखल घेऊन मातोश्री पांदण रस्ता योजनेअंतर्गत आंतरवाली ते बगेवाडी रस्त्याच्या कामाचा शिवसेना नेते, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास  मधुकर मस्के, शिवसेना तलवाडा सर्कल गटनेते गोविंद  जोशी, अंबादास आठवले , पांढरी सरपंच सुंदर  तिवारी, पप्पू चौधरी,  ग्रामपंचायत सदस्य विशाल  उमप, रणजित कांबळे, प्रल्हाद मस्के, बाळासाहेब राठोड, राम  वावरे,  रामहरी वावरे, प्रल्हाद वावरे, अविनाश वावरे, गणेश वावरे, रमेश आण्णा वावरे, अंबादास शिंदे, संतराम आण्णा उमप, भास्कर मकासरे, उत्तम दादा उमप, सोना रोकडे, आण्णा कर्डिले, बंडू इंदलकर, दामू अण्णा वावरे, सुनील गायकवाड, योगेश शिंगाडे, अनिल गायकवाड, प्रल्हाद धापसे,राहुल मकासरे, कृष्णा उमप, किशोर उमप, सलंम उमप, शिवा उमप, बाबासाहेब कदम, प्रकाश मकासरे, वैभव शिनगारे आदींसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.