कार्य सम्राटांच्या कार्याला यश सर्वसामान्यांना दिलासा
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
तालुक्यात अडीच हजारात एक ब्रास वाळु घरपोच मिळणार- आ. लक्ष्मण पवार
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
आ. लक्ष्मण पवारांचे उपोषण अखेर मागे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गेवराई: प्रतिनिधी
विधानसभा मतदार संघातील नियमबाह्य वाळु तस्करी बंद करून सर्व सामान्यांना माफक दरात वाळु मिळावी या मागणीसाठी आ. लक्ष्मण आण्णा पवार यांनी दि. २४ मे रोजी आयोजित उपोषणा दरम्यान केली होती
त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आ. पवारांच्या उपोषणाची दखल घेत दि. २४ सोमवार रोजी तातडीने प्रशासकीय अधिकारी व टेंडर मालकांची बैठक बोलावून आ. लक्ष्मण पवार यांच्या मागणी प्रमाणे गेवराई तालुक्यातील व बीड जिल्ह्यातील नागरिकांना माफक दरात वाळु देण्यासाठी सुचना देण्यात आली होती यावेळी सर्व टेंडर मालकांनी आ. लक्ष्मण पवार यांच्या मागणी नुसार गेवराई तालुक्यात २५०० रु तर सिदफणाच्या पलीकडे म्हणजे बीड तालुक्यात ३००० रुपये ब्रास प्रमाणे वाळु देण्याचा निर्णय केला आहे
जिल्हाधिकारी यांनी आ. लक्ष्मण पवारांच्या मागणीनुसार कमी दरात वाळु देण्याची सुचना केली होती यावेळी सर्व टेडर मालकीनी तयारी दाखवली आहे त्यामुळे आ. लक्ष्मण पवार यांनी आपले उपोषण तुर्तास मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात ते म्हणाले की गेवराई तालुक्यातील नागरिकांना २५०० रू ब्रास वाळु मिळणार आहे तर सिदफणाच्या पलीकडे ३००० हाजार रूपये ब्रास वाळु देण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकी दरम्यान ठरले आहे तर वाहन धारकांनी टेंडर चालका कडुन फक्त १००० रुपये ब्रास प्रमाणे वाळु घेऊन तालुक्यातील ग्राहकांना फक्त २५०० रु ब्रास प्रमाणे घरपोच विक्री करावी तर मतदारसंघात ३००० रुपये वाळु द्यावी अशा सुचना सर्व टेंडर चालकांना देण्यात आली आहे जर कोणी वाहान धारक जास्त दराने वाळु देत असेल तर त्या वाहान धारकांच्या गाडी नंबर सहीत लेखी तक्रार माझ्या कार्यालयात करावी असे आवाहन आ. लक्ष्मण आण्णा पवार यांनी उपोषण मागे घेताना नागरिकांना केले आहे
