र. भ. अट्टल महाविद्यालयात संजय मगर यांचा विद्यार्थ्यांशी संवाद
गेवराई (प्रतिनिधी)
र भ अट्टल महाविद्यालयात माजी विद्यार्थी मासिक संवाद कार्यक्रमांतर्गत 13 मार्च 2021 रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यासोबत संवाद साधून स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी या विषयावर संजय मगर, प्रशासकीय अधिकारी, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संस्था लातूर, यांनी मार्गदर्शन केले. संजय मगर यांनी प्रथम विविध विभागात त्यांनी स्वतः केलेल्या प्रशासकीय सेवेचा अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडला. कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी विशेष कौशल्य आवश्यक असतात. ती कौशल्य आत्मसात करून योग्य अभ्यासातून यश संपादन करता येते. तसेच आपल्या आवडीनुसार ध्येय निश्चित करून ते साध्य करण्याची क्षमता विकसित करणे व येणाऱ्या संधीचा फायदा घेऊन आपले करियर बनवणे गरजेचे आहे. केवळ छंद अथवा नौकरी म्हणून कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी न करता आपले करिअर महत्त्वपुर्ण मानून तयारी करावी, असे नमूद केले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विजयकुमार सांगळे यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात उपलब्ध सुविधा व ग्रंथालयातील पुस्तकांचा उपयोग करुन आपले करिअर बनवावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमास डॉ. समाधान इंगळे, डॉ. सुहास मचे, प्रा.जोगदंड बाळासाहेब, प्रा. प्रदिप दहिंडे, डॉ. माने, प्रा. शरद सदाफुले यांच्या सह विद्यार्थी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे संचलन प्रा.हनमंत हेळंबे यांनी तर आभार प्रा. शरद सदाफुले यांनी मानले.