महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

|| साहेब ||

     || साहेब  ||

जवळून पाहावेत आणि प्रत्यक्ष अनुभवावेत असे गेट व्यक्तिमत्व म्हणजेच भैय्यासाहेब...
साधारणपणे 1994-95 ची ही घटना असेल... मी लहान होतो आणि बसने गेवराईहून बीडला चाललो होतो.. बस गढीच्या मंदिरा जवळून जात असताना गाडीतील लोक खिडकीतून डोकावून पहात होते काय झाले असावे म्हणून मीही बाहेर पाहिले तर गढी येथील मंदिरासमोर सोलापूर- धुळे हायवेवर एका गाडीजवळ खूप गर्दी दिसत होती आणि एक उंच, गोरापान, जीन्स चे कपडे आणि केसांचा ठाशीव भांग पडलेला एक सुंदर तरुण लोकांशी संवाद करताना दिसत होता. चेहऱ्यावर असलेले तेज आणि बोलण्यात असलेला आत्मविश्वास ठळकपणे दिसत होता आणि तो चेहरा दिवसभर माझ्या लक्षातून जातच नव्हता..कोणाचा चेहरा होता तो... तर तो चेहरा होता तालुक्याचे शिल्पकार आदरणीय शिवाजीराव दादा पंडित यांचे थोरले चिरंजीव आदरणीय भैय्यासाहेब म्हणजचे आज राज्यात सर्वत्र परिचित असलेले मा.अमरसिंह पंडित साहेब यांचा.... त्यावेळी आदरणीय भैय्या साहेब हे नुकतेच आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राजकीय जीवनात पदार्पण करत होते... अत्यंत हुशार आणि कल्पक, फाडफाड इंग्रजी भाषेत बोलणारा तरुण म्हणूनच त्यांची ओळख निर्माण होऊ लागली होती... पुढे पंचायत समितीच्या माध्यमातुन साहेबांचा राज्याभिषेक झाला... गावागावात अमरसिंह पंडित यांच्या बाबतीत जोरदारपणे चर्चा ऐकायला मिळत.. मी सुध्दा 1995 पासून भैय्यासाहेबयांचा फॅन झालो होतो.. आदरणीय शिवाजीरावदादा काँग्रेस पक्षाचे आमदार व पुढे राज्यमंत्री राहीले आणि थोड्याच दिवसात त्यांनी आपला वारस म्हणून भैय्यासाहेब यांना पुढे केले ...त्यावेळी चकलांबा या गावात भैय्यासाहेब यांनी एक भव्य मेळावा आयोजित केला होता.. छगन भुजबळांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्याला मी सुध्दा आमच्या गावातील लोकांसोबत टेम्पोत बसून गेलो होतो... त्यावेळी मी भैय्यासाहेब यांना जवळून पाहिले आणि त्यांच्या वक्तृत्वाची छाप माझ्या मनावर पडली ती आजही कायम आहे.  मी भैय्यासाहेब यांच्या सभेला कोठेही कसेही करून उपस्थित राहत असे... नेता म्हणून माझ्या मनावर भैय्यासाहेब यांची खूप मोठी छाप पडली होती आणि ती आजही कायम आहे. त्यावेळी आजच्या सारखे बँनर नव्हते म्हणून पोस्टरवर असलेला भैय्यासाहेब यांचा फोटो मी माझ्या घरावर लावत होतो... मी कॉलेज मध्ये असताना नेहमीच विविध प्रकारच्या स्पर्धा, कार्यक्रमांत सहभागी होत असे..आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत फोटो काढून घेणे मला खूपच आवडत असे.. पुढे काही दिवसांनी मी शिक्षणानंतर बाहेरगावी गेलो आणि साहेबांच्या भेटीत अंतर पडले... मी पुढे पुन्हा नेट उत्तीर्ण होऊन आपल्याच र भ अट्टल महाविद्यालय गेवराई येथे सी.एच.बी.वर काम सुरू केले त्यावेळी आदरणीय भैय्यासाहेब यांना पुन्हा भेटण्याचा योग आला.. पुढे 2017 मध्ये आमचे रेवकी हे गाव जिल्हा परिषद सर्कल झाले आणि योगायोगाने ते एससी प्रवर्गासाठीच राखीव झाले. या दरम्यान भैय्यासाहेब यांना भेटण्याचा योग पुन्हा पुन्हा आला.. आमचे गावकरी मंडळी आणि तत्कालीन सरपंच रोहिदासनाना सौंदलकर  आणि गोकुळ चोरमले यांच्या सोबत भेट घेतली आणि जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून उमेदवारी देण्यात यावी अशी विनंती केली.. त्यानंतर निवडणूक जाहीर होऊन उमेदवारी जाहीर झाली. निवडणूक पार पडली दुर्दैवाने आम्ही पराभूत झालो पण या सगळ्या प्रवासात माझे सहप्रवासी म्हणून आमचे स्नेही श्री विलासकाका देवकते यांनी जी भूमिका पार पाडली तिला मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही.. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवारी निश्चित करताना साहेबांनी आमच्या सर्कलमधील सर्व वीस गावातील लोकांसोबत चर्चा केल्यानंतर फक्त विलासकाका आणि राऊकाका यांच्यावर विश्वास ठेवून संधी दिली... यामुळे मला खूप शिकायला मिळाले... साहेबांचा जवळून सहवास लाभला आणि लोकांच्या मनात असलेल्या साहेबांच्या प्रतिमेपेक्षा वेगळे असलेले, अत्यंत मनमिळावू, मोकळे, दिलखुलास, अत्यंत काटेकोर नियोजन करण्यात माहीर असलेले व्यक्तिमत्व, दूरदृष्टी ठेवून विचार करणारे, लोकांना वेळ देणारे, अत्यंत धावपळ करून सुध्दा रात्री उशिरा पर्यंत चर्चा करणारे, कार्यकर्त्याची काळजी करणारे, लाड करणारे, पुढच्या व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणारे, जे काम करणे शक्य आहे त्याचाच शब्द देणारे आणि तो शब्द पाळणारे, कोणालाही खोटे आश्वासन न देता सरळ नकार देऊन मोकळे होणारे साहेब मला खूप जवळून पाहायला आणि अनुभवायला मिळाले... 
अफाट बुद्धिमत्ता आणि प्रचंड स्मरण शक्ती लाभलेले साहेब.. प्रत्येक गावातील अनेक लोकांना अगदी नावानिशी बोलून मन जिंकणारे, कोणत्याही विषयावर सखोल अभ्यास करून मत मांडणारे, जनतेच्या प्रश्नांवर अतिशय मेहनतीने लढा देणारे, स्वत:च्या वागण्यात प्रचंड बदल करण्यात यशस्वी झालेले, अतिशय हळवेपणा असलेले, अतिशय लोकप्रिय असलेले व्यक्तिमत्व, ज्यांची स्वत:ची प्रशासकीय अधिकारी होऊन समाजाला न्याय देण्याची इच्छा होती पण ती पुर्ण करता येत नाही हे लक्षात आल्यानंतर आपला गेवराई ‘तालुकाच अधिकारी घडविणारा तालुका व्हावा म्हणून प्रयत्न करणारे, उत्कृष्ट खेळाडू म्हणून परिचित असलेले आणि पुढील काळात राज्याच्या राजकीय पटलावर महत्वाची भूमिका करताना, जबाददारी यशस्वीपणे पेलण्यासाठी सज्ज असतील असे आमचे सर्वांचे लाडके नेते श्रीमान अमरसिंह पंडित साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या... साहेब आपणास उदंड आयुष्य लाभो आणि आपल्या हातून सातत्याने सत्कार्य घडो हीच सदिच्छा..
प्रा. शरद सदाफुले 9405915575