गेवराईत तरुणांचा फिटनेस कडे कल वाढला
शुभम घोडके
गेवराई ( प्रतिनिधी )जीवनात नेहमी उत्साही आणि आनंदी राहण्यासाठी व्यायामाची गरज असते आजच्या युगात 'फिटनेस' या नव्या संकल्पनेने अशी सगळी 'जिम्स' तयार केली आहेत. त्यांच्या प्रशिक्षणाचा अनेकांना फायदा होत आहे. व्यायामामुळे प्रत्येकाचे शरीर आणि मन कार्यक्षम बनते उत्साही मन आणि टोनड, जिमदार शरीर म्हणजे आरोग्य या संकल्पनेतून एक नंबरी शरीर. योग्य व्यायामाद्वारे आपले मन आणि आरोग्य निरोगी ठेवणे आपल्यावर अवलंबून आहे.
शरीर आनंदी असेल तरच मन आनंदी होईल' या तत्त्वानुसार मन प्रसन्न राहते आणि कोणतेही बुद्धीचे कार्य योग्य रीतीने पार पाडण्यासाठी निरोगी शरीर आवश्यक असते. हे सर्व व्यायामामुळेच शक्य आहे
चांगले आरोग्य मिळविण्यासाठी, नितळपणा आणि उत्साह प्राप्त करण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे स्वामी विवेकानंद यांचे विचार मी सतत वाचन करत असताना ते तरुण पिढीला नेहमी सांगतात ज्या तरुणांची शरीरे खराब झाली आहेत ज्यांचे मनगट ठेचले आहेत त्यांना काहीही व्यायाम होणार नाही. यासाठी व्यायामाद्वारे शरीराला सक्षम करणे आवश्यक आहे आपले बल आपले शरीर आणि मन मजबूत करण्यासाठी नियमित व्यायाम करा जे खंबीर असतात तेच जीवनातील विविध संघर्षांना तोंड देऊ शकतात कारण व्यायाम गृहात नेहमी आनंदाच्या लहरी असु शकतात असे असताना देखील सध्या तरी गेवराईत तरुणांचा फिटनेस कडे कल वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे
